भाजपा नेते जगदीश मुळीक यांच्या फाउंडेशने आयोजित केलेल्या नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यास मला प्रमुख पाहुणी म्हणून...
Read Moreभाजपा "प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः"
प्रकोष्ठबद्दल
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ : संस्कृती आणि कला जपणाऱ्या कलाकारांसाठीचे हक्काचे व्यासपीठ.
जगातील सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला व भारतदेशाला जागतिक महासत्ता घडविण्यासाठी आपले सर्वस्वी प्रयत्नांची पराकाष्ठा करत, सर्वसामान्य शेतकरी कृषीक्षेत्र, औद्योगिक उद्योगक्षेत्र, लघु उद्योगक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, धार्मिकक्षेत्र, कला व सांस्कृतिक क्षेत्र, सामाजिकक्षेत्राला न्याय देत सर्वसामान्यपासून काम करत एका बलाढ्य उंचीवर पोहचलेला जनतेच्या मनातील राजकीय पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी.
भारतीय जनता पार्टी आज प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपल्या यशाचा आलेख उंचावत आहे. संपूर्ण जगातील रामभक्तांचे ५०० वर्षांपासूनचे स्वप्न आज भारतीय जनता पार्टी राममंदिर च्या माध्यमातून साकारत आहेत. त्याबरोबर भारत देशाला एक जागतिक महासत्ता बनवत एक बळकट देश बनवत आहे.
यासर्वांत कार्य करण्यासाठी पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी अनेक अविभाज्य विभागांची स्थापना केली, त्यातीलच एक अविभाज्य विभाग म्हणजे कला व सांस्कृतिकक्षेत्र विभाग होय. या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य कलाकार ते अगदी लोकप्रिय कलाकारांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या गरजा व त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यामाध्यमातून एक मोठे व्यासपीठ तयार केले आहे.
या सांस्कृतिक व्यसपिठाच्या माध्यमातून कलाकारांचे असणारे प्रश्न, वयोवृद्ध कलाकारांसाठी पेन्शन, तमाशालोककला, पथनाट्यकला, वारकरी सांप्रदायिक कला, मराठी सिनेसृष्टी, व या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी हा विभाग कार्य करत आहेत. यामाध्यमातून प्रत्येकाला घडवण्यासाठी व एकसंध ठेवण्याचे काम चालू आहे. देशातील व राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक कलाकारांची जाण व त्यांची कला जतन व्हावी, तिला चांगले व्यासपीठ मिळावे व ती सर्वांपर्यंत पोहचली जावे यासाठी हा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करतो.
अगदी प्रत्येकाच्या प्रश्नांची व गरजांची उणिवा लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी सांस्कृतिक विभाग सर्वतोपरी प्रयत्न करतोय त्यांना भक्कम असा व्यासपीठ तयार करतोय. कोणत्याही अडचणीत प्रत्येक कलाकारांच्या मागे भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक विभाग भक्कमपणे उभा आहे.
आज ह्या कलाकारांच्या मागे भक्कमपणे उभे राहिलो तर त्यामाध्यमातून ती कला जिवंत राहील, त्या कलेचे व कलाकारांचे मोल सर्वांपर्यंत पोहचले जावे, ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षबांधणीत व पक्षसदस्य एकसंध राहण्यात खूप मोठी मदत होत असते.
सांस्कृतिक क्षेत्रामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती रोजच्या धकाधकीच्या जिवणातून मनमोकळे जिवन जगत असते, त्यांचे मनोरंजन होत असते. त्यांचा काम करण्याचा उत्साह आणखी वाढत असतो. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्र व कलाकार हे जगले तरच ह्या कला अजरामर होतील व आपली परंपरा जोपासली जाईल.
कलाकारांसाठी वेगवेगळ्या मानधन योजना, नवनवीन उपक्रम, कलाकारांचे प्रश्न, यामाध्यमातून पक्ष सामाजिक सलोखा जपत सांस्कृतिक क्षेत्र व संस्कृती जपण्यासाठी काम करत आहेत.
आपण ही यामाध्यमातून एकजूट होऊन कलाकार व कलेच्या मागे भक्कमपणे उभे राहून आपल्या देशाची राज्याची परंपरा जपुया.
समाजकारण
राजकारण
श्री देवेंद्र फडणवीस
सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा महाराष्ट्र
उपक्रम
सांगली येथील भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ यांनी कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांचा सन्मान केला.
सांगली येथील भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या विभाग सहसंयोजक अपर्णा गोसावी यांनी कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांचा सन्मान केला...
Read Moreभारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ वतीने कलाकार कक्षाचे आयोजन करण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया काल पुणे येथे अनंत चतुर्दशी चा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला,...
Read Moreसोशल मिडिया
सदस्य व्हा... खालील फॉर्म भरा.
सदस्य व्हा... खालील फॉर्म भरा.
संपर्क
फोन
+ 91 99 2020 1230
ई-मेल
office@bjpmaharashtra.org
पत्ता
BJP HQ, Nariman Point, Mumbai – 400004