

काल पुणे येथे अनंत चतुर्दशी चा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती …
भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या (अजितदादा गट) संयुक्त विद्यमाने कलाकार कक्षाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे मानाचे गणपती व इतर मंडळे, त्याचप्रमाणे हा उत्सव यशस्वी पणे पार पडावा म्हणून रात्रंदिवस झटणारे पोलीस प्रशासन, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्था या सगळ्यांचा सन्मान आमच्या वतीने केला , याशिवाय तातडीने सेवा देणारी ऍब्युलन्स ही आम्ही उपलब्ध केली होती ज्यामुळे अनेकांना मदत मिळाली.
या स्वागत कक्षात पुण्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील व पार्टीच्या अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आणि त्यांचा ही आमच्या कलाकरांतर्फे सत्कार करण्यात आला. माझ्या सर्व कलाकार मित्रमैत्रिणीनीं ही अगदी उत्साहात हजेरी लावली, सुरेखा कुडची, मेघा घाडगे, शंतनू गंगणे, मेघा धाडे, सुधीर निकम,चेतन चावडा, इ.
आणि ज्यांच्या मुळे हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी झाला, त्याच श्रेय व विशेष योगदान मा. अमरशेठ गवळी व मा. मंगेशजी मोरे यांचं आहे. त्याच बरोबर नितीन ननावरे, जगदीश माने , गणेश भाऊ आबनावे, सचिन काळे, शैलेंद्र परदेशी, रवींद्र ढमाले, समीर तिखे , संतोष साखरे ,धनंजय वाठारकर,श्री व सौ गौरी वनारसे आणि आझाद मित्र मंडळ लक्ष्मी रोड , या सर्वांचा हातभार लागला आहे.
दरवर्षी गणराया आम्हाला अशीच सर्वांची सेवा करण्याचे बळ देईल हीच प्रार्थना 





0 Comments