6 एप्रिल 1980 मध्ये भारतीय जनता स्थापन करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी बीजेपीचे पहिले संस्थापक अध्यक्ष बनले. 1980 मध्ये भाजपला त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळाला. 2014मध्ये भाजपने संपूर्ण बहुमत मिळवलं. भाजपला 282 जागांवर विजय मिळाला. तर 2019मध्ये 303 मध्येही भरगोस मतांनी विजय मिळाला.
आजचा भाजपा म्हणजेच पूर्वीचा भारतीय जनसंघ होय. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. गांधीच्या हत्येनंतर संघावर (आर.एस.एस.) बंदी घालण्यात आली. तेव्हा त्यांच्या वतीने संसदेत कुणीच नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांना राजकीय पक्षाची गरज भासू लागली. मुखर्जी मंत्रिमंडळातून बाहेर पडले व त्यांनी ‘भारतीय जनसंघाची’ स्थापना केली. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा, असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला.
१९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. या पक्षात जनसंघाचे १०० खासदार होते. तेव्हाही, ‘सर्वांनी मिळून काँग्रेसला पराभूत केले’, अशीच जनसंघाची भूमिका होती. जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीत विदेशमंत्री म्हणून अटलबिहारी वाजपेयी आणि सूचना व प्रसारण मंत्री म्हणून लालकृष्ण आडवाणी यांनी महत्वाची कामगिरी बजावली. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीत फूट पडल्यानंतर पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या खासदारांनी तातडीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. भाजपाच्या अध्यक्षपदी अटलबिहारी वाजपेयी यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपाच्या स्थापनेच्या वेळी अटलबिहारी म्हणले होते ,”अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा”. तरी पहिल्या दशकाच्या प्रारंभी भाजपच्या प्रचार, प्रसाराला असणार्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. इंदिराजींच्या हत्येनंतर १९८४च्या लोकसभा निवडणुकीतील सहानुभुतीच्या लाटेत अन्य पक्षांप्रमाणे भाजपचीही वाताहत झाल्यानंतर तर पक्ष नेतृत्वासह कार्यकर्ते सैरभैर झाले. १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या. मात्र राजीव गांधी यांनी अतिआत्मविश्वासात राम जन्मभुमी आंदोलनास गती दिल्यानंतर भाजपला दिल्लीतील सिंहासनापर्यंत घेऊन जाणारा रस्ता मिळाला. याच २ खासदारांच्या जोरावर भाजपाची आगेकूच पुढे सुरूच राहिली होती. अयोध्येच्या मुद्यासोबत भाजपच्या नेतृत्वाने अत्यंत कुशलतेने नव्वदच्या दशकात अनेक ओबीसी नेत्यांना लॉंच केले. मंडल व कमंडलचे राजकारण हे वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या विरूध्द वाटत असले तरी भारतीय जनता पक्षासाठी मात्र ते लाभदायक ठरले हे मात्र निश्चित. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले.
१९८९ मधे ८६, १९९१ मधे ११९, १९९६ मधे १६१, १९९८ मधे १७९ आणि १९९९ मधे १८२ असा भाजपाचा लोकसभेतील खासदारांचा आलेख उत्तरोत्तर वाढतच गेला आहे. सन १९९६ मध्ये भाजपाने प्रथमच सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला. अपुऱ्या संख्याबळामुळे ते सरकार अवघ्या तेरा दिवसात सत्तेवरून गेले. १९९७ मध्ये ‘स्वराज्याकडून सुराज्याकडे’ अशी घोषणा देत पक्षाने रथयात्रा काढली. भाजपाने या विषयांवर इतर पक्षांनाही आपल्या बरोबर घेण्यात यश मिळविले. ‘स्वराज्याकडून सुराज्याकडे’ ही घोषणा यशस्वी ठरली.
विविध पक्ष भाजपाबरोबर आले. १९९८ ला पुनः भाजपाचे सरकार आले पण फ़क्त १३ महिने टिकले.मात्र,१९९९ च्या लोकसभेत भाजपपुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप सरकार ५ वर्षे सत्तेवर राहिले. स्वातंत्र्यानंतर ५ वर्षे टिकणारे हे पहिलेच बिगर कॉंग्रेसी सरकार होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल २८२ जागा जिंकत लोकसभा जिंकली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागांची संख्या ३३६ वर जाऊन पोचली आणि केंद्रात एक मजबूत सरकार बनवले.
पुढे २०१९ व २०२४ मध्येहि भरगोस मतांनी भाजपा निवडून येऊन देशाला नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा नेतृत्व मिळाले व देशाची सेवा अविरत करत आहे.