अध्यक्ष, सांस्कृतिक प्रकोष्ठ

मनोगत

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे.

नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये त्या सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णकाळ गाजवला. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना कलाकार, तंत्रज्ञ व चित्रपटात इतर काम करणारे सर्व सामान्य लोक यांच्या असणाऱ्या गरजां व त्यांच्या अडचणीकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी आपले अभिनयाचे काम चालू ठेवत सामाजिक जबाबदारी म्हणून सिनेसृष्टीत किंवा इतर क्षेत्रातील कलाकारांसाठी सामाजिक कार्य सुरू केले.

ग्रामीण बाजाच्या भूमिका करताना लागणारा रांगडेपणातरीही चेहऱ्यावर दिसणारा गोडवागालावर पडणारी खळी आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे प्रियाताई बेर्डे. यांचा जन्म कोल्हापूर येथे झालापण त्यांचे बालपण मात्र मुंबईत गेले. त्यांचे वडील अरुण कर्नाटकी हे दिग्दर्शक होतेतर आई लता अरुण या उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली होती. मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातूून प्रिया यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बेबी नंदा या अभिनेत्री आत्याच्या मार्गदर्शनाने व माया जाधव या मामीकडे प्रिया अरुण नृत्य शिकल्या. माया जाधव यांच्यासमवेत वयाच्या १२ व्या वर्षापासून प्रिया अरुण यांनी नृत्याचे कार्यक्रम केले. त्यासाठी त्या पॅरिसमॉरिशसस्वीत्झर्लंड आदी देशांमध्ये जाऊन आल्या.

या कार्यक्रमांमध्ये नृत्य करत असतानाच त्यांना व्ही. शांताराम यांच्या तेरा पन्ने’ या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे हे काम चालू असतानाच त्यांना गिरीश घाणेकर व सचिन पिळगावकर यांनी अशी ही बनवाबनवी’ (१९८८) या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारले. पण या वेळी त्यांना वयाची अठरा वर्षेही पूर्ण झालेली नसल्यामुळे या चित्रपटाच्या करारनाम्यावर त्यांच्या वडिलांनी – अरुण कर्नाटकी यांनी सही केली. या चित्रपटातील ग्रामीण कमळी’ त्यांनी नेटकेपणाने रंगवली. या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांना ग्रामीण ढंगाच्या भूमिकाच प्रामुख्याने मिळत गेल्या. त्यात थरथराट’ (१९८९), ‘येडा की खुळा’ (१९९१),  ‘शेम टू शेम’ (१९९३), ‘बजरंगाची कमाल’ (१९९४) या चित्रपटांची नावे घ्यावी लागतील. यात त्यांना साथ लाभली ती सहकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांची. आणि पुढे तर अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी वारंवार दिसत गेली.

जत्रा’ (२००६) या विनोदप्रधान चित्रपटात प्रिया अरुण यांनी सरपंचाची भूमिका साकारली. संपूर्ण चित्रपट विनोदावर आधारित असूनही ही सरपंच स्त्री गंभीर प्रवृत्तीची दाखवली आहे. आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटना हास्यप्रधान असूनही त्याचा आपल्या अभिनयावर परिणाम न होऊ देता गंभीर भूमिका साकारण्याचे तंत्र प्रिया बेर्डे यांनी या चित्रपटात सातत्याने सांभाळलेले दिसते. फुल थ्री धमाल’ (२००८) या चित्रपटात दैनंदिन आयुष्याला कंटाळलेल्या आणि काहीतरी नवीन करण्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आचवलेल्या तीन मैत्रिणींपैकी एकीची भूमिका प्रिया बेर्डे यांनी केली. जोगवा’ (२००९) या चित्रपटात त्यांनी मुख्य देवदासी स्त्रीची भूमिका केली. चल धर पकड’ (२०१०) या ग्रामीण पार्श्‍वभूमीच्या चित्रपटातही त्यांनी केलेली भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. नटरंगमधील (२०१०) त्यांनी साकारलेली आईही तंतोतंत उतरली आहे. याच दरम्यान त्यांनी तमाशा’ या चित्रपटात फडावर नाचणाऱ्या तमासगिरिणीची केलेली भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील वेगळ्या धाटणीची भूमिका होती. ग्रामीण ढंगाच्या भूमिकांमधून त्यांनी सातत्याने कामे केलेली असलीतरी त्या पार्श्‍वभूमीवर तमासगिरिणीची त्यांची भूमिका वेगळेपणाने उठून दिसते.

प्रिया बेर्डे यांनी छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले आणि मैने प्यार किया’, ‘हम आपके है कोन’ या चित्रपटांमध्येही कामे केली. मराठी व हिंदी चित्रपटात काम करत असतानाही त्यांनी दूरदर्शनवरच्या मालिकांमध्ये काम करणे चालूच ठेवले. अजूनही चांदरात आहे’ या स्टार प्रवाहच्या मालिकेत त्यांनी कर्नाटकी पद्धतीची आऊसाहेब रंगवली.

चित्रपट शूटिंग वेळी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचे जाणे झाले. त्या ज्या ठिकाणी जात तेथील सामान्य कलाकार मग लोकनाट्यकला, पथनाट्यकला, शाहिरकला व इतरही कलाक्षेत्रातील अशाप्रकारच्या अनेक कलाकारांसोबत त्या हितगुज करत, त्यांचे प्रश्न जाणून घेत व ते सोडवण्यासाठी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करत असत.

सामाजिक जबाबदारी म्हणून याकडे बघत त्यांचे अनेकांना मदत करण्याचे त्यांचे कार्य चालू होते. पण स्थानिक पातळीवर आपण किती प्रश्न सोडवणार, काही मोठे मोठे प्रश्न असायचे, व ते सरकारकडून मंजूर करून किंवा त्यासाठी लढा द्यावा लागायचा. पण मग यासाठी कोणतेतरी राजकीय व्यासपीठ भक्कम असावे. म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला, तेथील सर्व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी जवळीक साधत आपल्या वैचारिकशैली व योग्य भूमिकामुळे त्यांचे एक चांगले प्रस्थ तयार झाले.

राजकीय क्षेत्रात आल्यामुळे सर्वसामान्य व इतरही कलाकार यांचे प्रश्न मांडणे व त्यांना योग्य दिशा देऊन त्यांना न्यायदानाचे काम प्रिया बेर्डे यांनी केले. त्या अगदी आजपर्यंत राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणत्याही हव्यासापोटी अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले आहे. आपण आपले कर्म करत रहायचे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, तरच आपण एक कलाकारांच्या पाठी उभी राहू शकतो, ह्या विश्वासाने त्यांनी आजपर्यंत आपलं कार्य चालू ठेवले आहे.

तळागाळातील सर्वसामान्य कलाकार ते एकडी प्रसिध्द कलाकार यांच्यासाठी व त्यांचा सरकारकडून योग्य तो मानसन्मान टिकवला जाईल, त्यांच्या कलेची सर्वाना जाणीव राहील व त्यांच्या वरील आलेल्या संकटांना तोंड देत ते सोडवत अशाप्रकारे असंख्य मराठी कलाकारांच्या पाठीमागे प्रिया बेर्डे या भक्कमपणे उभ्या राहील. आणि येणाऱ्या भविष्यात देखील त्या मागे हटणार नाही ते आपले कार्य अखंडपणे चालू ठेवणार आहेत.

आपल्या अभिनय व सामाजिक कार्यात व्यग्र असताना त्यांनी चित्रपट महामंडळच्या संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्याबरोबर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्या आयोजन करत असतात.

अशा या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांशी असलेली नाळ व त्यांच्यासाठी झटणारी अभिनेत्री आज महाराष्ट्र भाजपा सास्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेश संयोजिका म्हणून अतिशय उत्तम कार्य करत आहेत.

परिचय

  • नाव : प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे 
  • जन्म : 30 जुलै 1970
  • पत्ता : भाजपा प्रदेश कार्यालय नरीमन पॉइंट, मुंबई
  •  जन्मगाव : कोल्हापूर
  •  शिक्षण : 
  • व्यवसाय : चित्रपट निर्मिती
  •  आवड : अभिनय, समाजसेवा

फिल्मोग्राफी 

वर्षशीर्षकभूमिकाइंग्रजीनोट्स
1988आशी हि बनवा बनवीकमळीमराठी
रंगत सांगतफुलदाणी
बंदिवान मी या संसारीतरुण कमल
नशिबवानगौरी
1989एक गडी बाकी अनादीसीमा किरकिरे
घरकुल पुन्हा हसावेप्रिया
थरथरतगंगा
ईजा बीजा तीजाअंबा भोसले
धरला तर चवतायमॅगी/अमृतादुहेरी भूमिका
दे धडक बी धडकनर्तक
१९९०घनचक्करमनु
धमाल बाबल्या गणप्याचीमालन
डोक्याला ताप नाहीरंजना
लपवा छपवीमीना
कुठे कुठे शोधू मी तिलानलिनी/नाले
1991अफलातूनबाळ
येडा की खुळाप्रिया
अपराधीसीमा
शेम टू शेमपल्लवी दादरकर/ शेवंता ओथुरकर
एक पूर्ण चार अर्धाराधा
मस्करीराणी
1992दीदारशीलाहिंदीबॉलिवूड पदार्पण
सोने की जंजीरबसंती
बीटाचंपा
एक होता विदुषकअतिथी देखावामराठी
1993अनारीबिजलीहिंदी
सारेच सज्जनसोनालीमराठी
राम रहीमअतिथी देखावा
1994हम आपके है कौन..!चमेलीहिंदी
बजरंगाची कमळमैनामराठी
सोन्याची मुंबईसखू
1995गुड्डूबलियाची पत्नीहिंदी
धमाल जोडीस्वातीमराठी
गंध मातेचापाउला
1996जानधन्नोहिंदी
2000चिमणी पाखरप्रिया पेंडसेमराठीविशेष देखावा
2006जत्राबकुळाबाई/अक्का
देवा शप्पथ खोत सांगेन खर संगर नाहीजानकी
गृहलक्ष्मीनर्तक
2007जबरदस्तजोडी जबरदस्तचे न्यायाधीशविशेष देखावा
2008पूर्ण ३ धमालप्रेमा तोफखाने
दम दम दिगाप्रिया
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवायशोदा
सकळ सावत्रवैशाली
2009माता एकविरा नवसाला पावलीसुमन
जोगवाशेवंता
टोपी घाली रेप्रिया
लागली पैजयोजना
2010चाल धर पाकडशांता
नटरंगयमुनाबाई सातारकर
2011अशी फसली ना नानाची टांगनानी नाना जोशी
तमाशा हाच खेळ उड्यायमुनाबाई
सुपरस्टार
2012बोकडशिक्षक
द स्ट्रगलर्स – आम्हि उद्यानाचे हिरो
उचला रे उचलासीमा
2013योद्धा
2013माला अण्णा व्याचयअण्णांची पत्नी
2014प्रेमाचा झोलझालाहीरा
2016लाल इश्करसिका
2017एक मराठा लाख मराठारुख्मणी
2019रामपातकाळूबाई
मेनका उर्वशीतुकाराम पाटील यांच्या पत्नी
2020अहिल्या – झुंज एकाकीअहिल्याची आईमराठी
2021लकडाउन सकारात्मक व्हाराहुलची आईमराठी

दूरदर्शन 

वर्षशीर्षकभूमिकासंदर्भ
1995पडोसनकॅमिओ देखावा[१०]
2007नाना हे नानाकादंबरी
2009-2011भाग्य लक्ष्मीजयश्री
2010फू बाई फूस्पर्धक
2012अजुनाही चंद्रात असेअनयची आई
2014-2015प्रिती परी तुजवरीप्रिती आणि परीची सासू
2015तू जिव्हाळा गुंतवावेनिनादची आई
2023सिंधुताई माझी मायसिंधुताईंची आजी[११]
  • अफलातून
  • अशी ही बनवाबनवी
  • एक गाडी बाकी अनाडी
  • चल धर पकड
  • जान
  • घनचक्कर
  • जत्रा
  • डम डम डिगा डिगा
  • तु. का. पाटील [४]
  • देवा शप्पथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही
  • धमाल जोडी
  • धरलं तर चावतंय
  • प्रेमासाठी
  • फुल थ्री धमाल
  • बजरंगाची कमाल
  • बेटा
  • बोकड
  • मला अण्णा व्हायचंय
  • येडा की खुळा
  • योद्धा
  • रंगत संगत
  • रंपाट [५]
  • द स्ट्रगलर – आम्ही उद्याचे हिरो

भाजपा "प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः"